News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

शिर्डी साईबाबा मंदिराचे सीईओ श्री.गोरक्ष गाडीलकर यांची पनवेलच्या श्री.साईबाबा मंदिराला भेट

शिर्डी साईबाबा मंदिराचे सीईओ श्री.गोरक्ष गाडीलकर यांची पनवेलच्या श्री.साईबाबा मंदिराला भेट

पनवेल - शिर्डी साईबाबा मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री.गोरक्ष गाडीलकर यांनी पनवेलच्या श्री.साईबाबा मंदिराला भेट दिली.

यावेळी त्यांनी सद्गुरु श्री साई नारायण बाबा आश्रम,श्री भगवती साई संस्थान पनवेलच्या श्री.साईबाबा मंदिराची पाहणी केली.मंदिरातील श्री साईबाबा आणि नारायण बाबा यांचे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी बोलताना,आपण सर्वजण एकाच परिवारातील आहोत.श्री साईबाबा यांचे कार्य आपण पुढे घेऊन चालत आहोत.तुम्ही कोणतीही सेवा करा,पण ती श्रद्धापूर्वक केली पाहिजे.शिर्डी येथे जगातल्या कानाकोपऱ्यातून साईभक्त दर्शनासाठी येतात.श्री साईबाबांची जे भक्त सेवा आणि भक्ती करतात,त्यांना निश्चितच आशीर्वाद मिळतो.मंदिराच्या एकूण कामकाजाबद्दल त्यांनी खूप समाधान व्यक्त केले.
श्री.साईबाबा मंदिराच्यावतीने कोऑर्डिनेटर राम थदानी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गोरक्ष गाडीलकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे स्वागत केले.यावेळी मंदिराविषयी सविस्तर माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment