News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

सिडकोच्या घरांच्या किंमती कमी केल्याबद्दल हजारो लाभार्थ्यांनी मानले आमदार विक्रांत पाटील व श्री. बाळासाहेब पाटील यांचे आभार!

सिडकोच्या घरांच्या किंमती कमी केल्याबद्दल हजारो लाभार्थ्यांनी मानले आमदार विक्रांत पाटील व श्री. बाळासाहेब पाटील यांचे आभार!

पनवेल : सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांसाठी साकारण्यात आलेल्या 'माझ्या पसंतीचे सिइको चे घर' या सिडको गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरांच्या वाढीव किमती कमी करण्यासाठी आमदार विक्रांत पाटील यांनी विविध पद्धतीने सातत्यपूर्ण संघर्ष केला.या लढ्याला यश मिळून किंमतीत झालेल्या कपातीमुळे लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, हजारो लाभार्थी नागरिकांनी एकत्र येऊन आमदार विक्रांत पाटील व कोकण म्हाडा माजी सभापती बाळासाहेब पाटील यांचे जाहीर आभार मानण्यासाठी आभार आणि संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
रॉयल गार्डन लॉन पनवेल येथे आयोजित या भव्य दिव्य कार्यक्रमात अनेक सिडको घरे लॉटरी विजेते लाभार्थ्यांनी आपल्या भावना मांडल्या.भावनिक होत त्यांनी आ.विक्रांत पाटील यांनी केलेल्या प्रामाणिक आणि यशस्वी प्रयत्नांबद्दल विशेष आभार मानले.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सिडकोकडून सुमारे ६७,००० घरांचे बांधकाम करण्यात येत असून, त्यापैकी २५,००० घरांसाठीची लॉटरी यापूर्वीच पार पडली होती. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभाग घेतला होता. मात्र, त्यानंतर सिडकोकडून जाहीर करण्यात आलेल्या घरांच्या किंमती अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने अनेक लाभार्थ्यांमध्ये नाराजी पसरली होती.

विशेष म्हणजे, या घरांच्या किंमती काही ठिकाणी खाजगी बिल्डरांच्या प्रकल्पांपेक्षाही अधिक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे ही योजना खरंच सर्वसामान्यांसाठी आहे का, असा प्रश्नही उपस्थित झाला होता.
या पार्श्वभूमीवर आमदार विक्रांत पाटील यांनी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मा. मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांच्याकडे विशेष बैठकांचे आयोजन करून व सर्व मुद्दे विस्तृतपणे मांडून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू होता. हिवाळी अधिवेशनात या विषयाला वाचा फोडत आंदोलन करण्याचाही प्रयत्न आमदार विक्रांत पाटील यांनी केला होता आणि त्यामुळे या विषयाची तातडीची बैठक नगरविकास मंत्री एकनाथ जी शिंदे यांनी आयोजित केली होती व त्यामध्ये आमदार विक्रांत पाटील यांनी सिडको अधिकाऱ्यांची नकारात्मक मानसिकता आणि त्यांनी त्यांच्याच बोर्ड ठरावाचे त्यांनीच केलेले उल्लंघन हे मुद्दे विशेष करून मांडले व त्यानंतर नगर विकास मंत्री यांनी सिडको अधिकाऱ्यांवरती ताशेरे ओढले होते.याच अधिवेशनात या सिडको घरांच्या किमती 10 टक्क्यांनी कमी करण्याचाही निर्णय श्री एकनाथ जी शिंदे यांनी आमदार विक्रांत पाटील यांच्या नावाचा व पाठपुराव्याचा उल्लेख करून जाहीर केला होता.

या निर्णयामुळे हजारो कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून,अनेकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न आता साकार होणार आहे.या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून, नागरिकांनी आमदार विक्रांत पाटील आणि श्री बाळासाहेब पाटील यांचे आभार माणण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार विक्रांत पाटील म्हणाले की, मला ही आमदारकी जनतेचे अश्रू पुसण्यासाठी व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलविण्यासाठी मिळाली असून जर या आमदारकीचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी झाला नाही तर या आमदारकीचा काहीच उपयोग नाही असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचा विषयात विषयात आपण यश मिळवले परंतु पुढेही असे जनहिताचे विषय घेऊन जनसेवेचा हा वसा असाच अविरतपणे सुरू राहणार असल्याचे ही श्रीं पाटील यांनी सांगितले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment