पनवेल महानगरपालिकेच्यावतीने १८ एप्रिलला भव्य 'खारघर हिल महापौर मॅरेथॉनचे आयोजन
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या वतीने येत्या शनिवार, १८ एप्रिल २०२६ रोजी सेंट्रल पार्क, खारघर येथे भव्य 'खारघर हिल महापौर मॅरेथॉन' (प्रोमो रन) चे आयोजन करण्यात आले आहे.निसर्गरम्य खारघर हिलच्या सानिध्यात होणाऱ्या या स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी असे आवाहन महापौर नितीन पाटील व आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.
*खारघर हिल महापौर मॅरेथॉन (प्रोमो रन) चे वैशिष्ट्य
खारघर हिलच्या निसर्गरम्य वातावरणामुळे ही मॅरेथॉन धावपटूंसाठी एक वेगळा अनुभव देणारी ठरणार आहे. या प्रोमो रनच्या माध्यमातून फिटनेस प्रेमींना एकत्र आणण्याचा प्रशासनाचा मानस आहे. नागरिकांमध्ये आरोग्याप्रती जागरूकता निर्माण व्हावी आणि शहरात क्रीडा संस्कृती वाढावी,या उद्देशाने ही मॅरेथॉन आयोजित केली जात आहे.
खारघर हिल महापौर मॅरेथॉन (प्रोमो रन) 10 किमी व 05 किमी अशा दोन गटांमध्ये होणार आहे. 10 किमी मॅरेथान सकाळी 5.45 तर 5 किमी मॅरेथॉन सकाळी 6.30 सुरू होणार आहे. पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी, व्यावसायिक धावपटूंनी आणि क्रीडाप्रेमींनी या 'प्रोमो रन'मध्ये सहभाग घेण्याचेआवाहन पनवेल महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
मॅरेथॉनची तारीख अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली असून, नोंदणी प्रक्रियेला नागरिकांनी उदंड प्रतिसाद द्यावा असे आवाहन पालिकेने केले आहे. ज्या नागरिकांना या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपली नोंदणी https://forms.gle/Sk5YLFit2cvL9QD99 या लिंकवरती त्वरित करून या भव्य क्रीडा सोहळ्याचा भाग व्हावे.
मॅरेथॉनचा मार्ग
५ कि.मी. मॅरेथॉनसाठी मार्ग
सेंट्रल पार्क → इस्कॉन मंदिर → ग्रामविकास भवन → मुंब्रा मेट्रो स्टेशन → मुर्बी जंक्शन यू टर्न → लोकनेते रामशेठ ठाकूर शाळा, सेक्टर 19 → ग्रामविकास भवन → सेंट्रल पार्क
१० कि.मी. मॅरेथॉनसाठी मार्ग
सेंट्रल पार्क → इस्कॉन मंदिर → ग्रामविकास भवन → मुंब्रा मेट्रो स्टेशन → मुर्बी जंक्शन यू टर्न → लोकनेते रामशेठ ठाकूर शाळा, सेक्टर 19 → ग्रामविकास भवन → उत्सव चौक → बेलापाडा मेट्रो स्टेशन यू टर्न → उत्सव चौक → गोल्फ कोर्स → सेंट्रल पार्क
स्पर्धेची अधिक माहिती
दिनांक: शनिवार, १८ एप्रिल २०२६
स्थळ: सेंट्रल पार्क, खारघर
प्रमुख आयोजक: पनवेल महानगरपालिका
Post a Comment