दिशा व्यासपीठाचा १०० उपक्रमांचा टप्पा पूर्ण! ...शताब्दी महोत्सवी वाटचालीनिमित्त कामोठ्यात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कृतज्ञता सोहळा
कामोठे - दिशा व्यासपीठाचा १०० उपक्रमांचा टप्पा पूर्ण झाल्याबद्दल या शताब्दी महोत्सवी वाटचालीनिमित्त कामोठ्यात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे,महाराष्ट्र दिनानिमित्ताने अस्मिता महाराष्ट्राची २०२६ अंतर्गत रॉयल महाराष्ट्र रनवे महाराष्ट्राची लोकधारा,रॉयल महाराष्ट्र गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सेवेचे व्रत जपताना, दिशा व्यासपीठाने १०० यशस्वी उपक्रमांचा टप्पा पूर्ण केला आहे.हा प्रवास केवळ आमचा नसून,आम्हाला साथ देणाऱ्या प्रत्येक हाताचा आणि कौतुक करणाऱ्या प्रत्येक मनाचा आहे.
या कृतज्ञता सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि महाराष्ट्र दिनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सर्वांना उपस्थित राहण्याची विनंती दिशा व्यासपीठातर्फे करण्यात आली आहे.
दि.२९ एप्रिल २०२६, बुधवार
ठिक - सायंकाळी ५:०० वाजता
राधाई इंकसाप स्कूल,जुडिओच्या बाजूला,सेक्टर ३६, कामोठे.
निमंत्रक
दिशा कल्चरल इव्हेंट
दिशा महिला मंच
"ती" च्या अस्तित्वाच हक्काचा व्यासपीठ
Post a Comment