News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेलच्या ओरायन मॉलचा १० वा वर्धापन दिन ... 'शॉप अँड विन'अंतर्गत रविवारी वॅगनआर कार,जावा बाईक जिंकण्याची संधी ... मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिची उपस्थिती

पनवेलच्या ओरायन मॉलचा १० वा वर्धापन दिन ... 'शॉप अँड विन'अंतर्गत रविवारी वॅगनआर कार,जावा बाईक जिंकण्याची संधी ... मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिची उपस्थिती

पनवेल: पनवेलकरांना मॉल संस्कृतीची ओळख करून देणारे आणि शहरातील रोजगार निर्मितीची महत्वाची भूमिका बजावलेल्या ओरायन मॉलने आपली गौरवशाली 10 वर्षे पूर्ण करत आहे. या निमित्ताने मॉलच्यावतीने रविवार दिनांक 3 मे रोजी सायंकाळी 7 वाजता ग्राहकांसाठी शॉप अँड विन हा लकी ड्रॉ उपक्रम आयोजित केला आहे.

ओरायन मॉलच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबवुन नागरिकांसाठी करमणुकीच्या दृष्टीने देखील व्यासपीठ उपलब्ध करून देतात.पनवेल येथे 31 मार्च ते 3 मे  या कालावधीत हा उपक्रम राबवला जात आहे.याअंतर्गत ग्राहकांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.विशेष म्हणजे प्रसिद्ध सिने अभिनेत्री ऋतुजा बागवे यावेळी आयोजित लकी ड्रॉसाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.ओरायन मॉलमध्ये 5 हजार किंवा त्याहून अधिक रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येईल.एका बिलावर किमान 5 हजारांची खरेदी आवश्यक आहे.या लकी ड्रॉमधील विजेत्यांना प्रथम बक्षीस मारुती सुझुकी वॅगनआर कार ,द्वितीय बक्षीस जावा बाईक आणि तृतीय बक्षीस 43 इंच स्मार्ट टीव्ही आदी बक्षिसे आहेत.पनवेलकरांच्या प्रेमामुळेच आम्ही 10 वर्षांचा टप्पा पार करू शकलो.ग्राहकांचा हाच उत्साह कायम रहावा म्हणून शॉप अँड विन हा उपक्रम राबवत असल्याची माहिती ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांनी दिली.पनवेलकरांना खरेदीसोबतच कार,बाईक आणि टीव्ही जिंकण्याची चांगली संधी वर्धापन दिनाच्या माध्यमातून केली गेली आहे.विजेत्यांची निवड लकी ड्रॉद्वारे केली जाणार आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment