News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वाटचालीत योगदान : प्रा.चंद्रकांत मढवी यांचा मालगुंड,रत्नागिरी येथे होणार सन्मान

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वाटचालीत योगदान : प्रा.चंद्रकांत मढवी यांचा मालगुंड,रत्नागिरी येथे होणार सन्मान

पनवेल - कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वाटचालीत योगदान दिल्याबद्दल कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.चंद्रकांत मढवी यांचा मालगुंड,रत्नागिरी येथे सन्मान होणार आहे.

मागील गेली अनेक वर्ष मराठी भाषा,मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी कार्य करणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वाटचालीत प्रा.चंद्रकांत मढवी यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे.प्रा.चंद्रकांत मढवी यांच्या योगदानाची दखल घेऊन कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सन्मान सोहळा कार्यक्रमात प्रा.चंद्रकांत मढवी यांचा सन्मान करण्यात येणार आहे.या सन्मानासाठी प्रा. चंद्रकांत मढवी यांचे मनःपूर्वक अभिनंदन

मंगळवार दि.२४ मार्च २०२६ रोजी रत्नागिरीच्या कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे सकाळी १० वाजता हा सन्मान सोहळा होणार आहे.

कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे संस्थापक अध्यक्ष असलेले प्रा.चंद्रकांत मढवी यांच्या उधल्या,बाजार या कादंबरी प्रकाशित झाल्या आहेत त्याचप्रमाणे अग्रायन कथासंग्रह आणि प्रहार कविता संग्रह प्रकाशित झाला आहे तर उत्कृष्ट कादंबरी म्हणून उधल्या कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा उत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार मिळाला आहे.दोन वेळा रायगड जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन,जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदावर प्रा.चंद्रकांत मढवी यांनी काम केले आहे.मुंबई विद्यापीठाच्या मराठी विषयासाठी एस.वाय.बी.ए च्या अभ्यासक्रमात त्यांच्या दोन कविता समाविष्ट आहेत.कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्ह्याच्यावतीने बाल साहित्य संमेलनाचे आयोजन आदी साहित्यिक कार्यक्रम-उपक्रम राबविले आहेत.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment