News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महानगर प्रेस क्लब अध्यक्ष पत्रकार प्रशांत शेडगे उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित

पनवेल महानगर प्रेस क्लब अध्यक्ष पत्रकार प्रशांत शेडगे उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित

पनवेल (प्रतिनिधी ) पनवेल येथील गेली अनेक वर्षे पत्रकारितेमध्ये लेखणीच्या माध्यमातून अनेक वंचित घटकांना न्याय देण्याबरोबरच विविध सामाजिक विषय मार्गी लावणारे पनवेल महानगर प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार प्रशांत शेडगे यांना नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोशियनचा मानाचा उत्कृष्ट पत्रकार म्हणून खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

नागोठणे येथे नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोशियनचा १४ वा वर्धापन दिन मोठया उत्सवात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार लोकनेते सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.त्याचबरोबर नागोठने ग्रामीण विभाग पत्रकार असोशियनचे अध्यक्ष अँड.महेश पवार,संस्थापक श्यामकांत नेरपगार,सचिव अनिल पवार व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.पत्रकार प्रशांत शेडगे गेली २० वर्षे पत्रकारितेत सक्रिय असून त्यांनी आता पर्यंत अनेक नामांकित वृतपत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.यामुळे पत्रकार शेडगे यांना पनवेल गौरव पुरस्कार,पनवेल भूषण पुरस्कार,महाराष्ट्र एक्सेलन्स अवार्ड बरोबरच अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यात आणखीन उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment