News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट ...मराठी शाळेत विविध साहित्यांचे वाटप

इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट ...मराठी शाळेत विविध साहित्यांचे वाटप

पनवेल - इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबने पनवेल येथील गुरुलिंगेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या मराठी शाळेत आवश्यक सुविधा सुधारण्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासाच्या उद्देशाने 'हॅपी स्कूल प्रोजेक्ट इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबने आयोजन केले.बहुतेक विद्यार्थी जवळच्या झोपडपट्ट्या आणि रेड-लाइट भागांमधून येतात,जिथे जागरूकता आणि पाठिंब्याच्या अभावामुळे शिक्षणाची संधी अनेकदा मर्यादित असते.हे लक्षात घेऊन,आमच्या उपक्रमाने त्यांच्यासाठी एक चांगले आणि अधिक प्रोत्साहन देणारे शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करुन या प्रोजेक्टचे आयोजन केले गेले.
क्लबच्यावतीने मराठी शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे यासाठी वॉटर प्युरिफायर,शिक्षणाला चालना देण्यासाठी ग्रंथालयातील पुस्तके आणि 'मेरी किताब'ची १०० पुस्तके आणि वर्गात आरामदायक वातावरण निर्माण करण्यासाठी एक पंखा भेट दिला.शालेय साहित्य व्यवस्थित ठेवण्यासाठी एक कपाट उपलब्ध करून देण्यात आले.जेवण बनवण्यास आणि स्वच्छतेस मदत करण्यासाठी १०-लिटरच्या कुकरसोबत ताट,चमचे आणि ग्लास भेट दिले.त्याचवेळी विद्यार्थ्यांना फ्रुटीचेही वाटप करण्यात आले.यावेळी क्लबच्या प्रेसिडेंट भूमिका परमार,सेक्रेटरी दिपा आडमुठे,आणि इतर मेंबर उपस्थित  होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment