पनवेलमध्ये मलाबार ज्वेलरी आयोजित फॅशन शो
पनवेल - मलाबार ज्वेलरी आयोजित फॅशन शो २०२६ पनवेलमध्ये नुकताच संपन्न झाला.या शोमध्ये जवळ जवळ ४० हुन अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.या शोमध्ये मिसमध्ये विजेती ठरली अलका तापरानिया तर प्रथम क्रमांक सुश्मिता द्वितीय क्रमांक मेहेक खान ह्यांना मिळाला.ह्या तिघींना सेश ट्रॉफी आणि क्राऊन देऊन सन्मानित करण्यात आले तर मिसेसमध्ये विजेती ठरली मेघा घोडके तर प्रथम क्रमांक अपूर्वा वंदिलें द्वितीय क्रमांक श्वेता अहिरे ह्यांना मिळाला ह्या तिघींना सेश ट्रॉफी आणि क्राऊन देऊन सन्मानित करण्यात आले याचसोबत या शोमध्ये संपूर्ण मेकअप अक्षता लांगोटे आणि चारू सप्रे यांनी केला तर पायल गावंड यांनी सुंदर असे वेस्टर्न आऊटफिट दिले.संपूर्ण शोची कोरिओग्राफी शुभांगी खैरे,फोटोग्राफी महेश बेलापूरकर,विडिओग्राफी युग,तर सूत्रसंचालनाची जबाबदारी सानिका राजगुडे यांनी पार पाडली या शोमध्ये परीक्षक म्हणून स्वाती सोनावणे आणि अंकिता सक्सेना यांनी काम पहिले.या संपूर्ण शोमध्ये विशेष अतिथी म्हणून प्रणया साळवी,पूनम सावंत,काजल चिकाने , पल्लवी दिवेकर हे उपस्थित होते.हे सर्व जण इंस्टाग्रामवर कन्टेन्ट क्रिएटर म्हणून सुद्धा काम करतात याचसोबत विशेष अतिथी म्हणून सौरभ भोईर सुद्धा उपस्थित होते.याचसोबत ह्या शोमध्ये सहभाग घेतलेल्याना सुद्धा ट्रॉफी आणि क्राऊन देऊन सन्मानित करण्यात आले.ह्या संपूर्ण शोचे व्यवस्थापन मंदार काणे एंटरटेनमेंटचे सर्वे सर्वा मंदार काणे यांनी केले तर हा शो करायला आम्हाला संधी दिल्याबद्दल मंदार काणे यांनी मलाबार ज्वेलरीच्या संपूर्ण टीमचे आभार मानले
Post a Comment