६० व्या वाढदिवसानिमित्ताने कवयित्री-लेखिका राजश्री नामदेव तुळसणकर यांच्या कथासंग्रह आणि कविता संग्रहाचे मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन
पनवेल । वार्ताहर- आपल्या ६० व्या वाढदिवसानिमित्त कवयित्री व लेखिका राजश्री नामदेव तुळसणकर यांच्या 'मनाच्या ओलाव्यात' हा कवितासंग्रह तर 'आस तुझ्या भेटीची' या कथासंग्रहाचे पनवेल येथे एका सोहळ्यात प्रकाशन झाले.याप्रसंगी जेष्ठ गझलकार ए.के.शेख तसेच कवयित्री व लेखिका डॉ.आशा श्रॉफ,रंगकर्मी श्री प्रमोद लिमये,प्रकाशक श्री संजय फडके अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांनी कवयित्री व लेखिका राजश्री तुळसणकर यांच्या पुस्तकांचे आणि साहित्य उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना जेष्ठ गझलकर ए.के.शेख यांनी,आज इंग्रजी भाषेचे प्रभुत्व वाढत असून मराठी बोलणार्यांची संख्याही कमी होत चालली आहे.त्यामुळे वाचन संस्कृती वाढवली पाहिजे.मराठी भाषा बोलली पाहिजे.मराठी शाळा या बंद पडत चालल्या आहेत,यावर आपण मात केली पाहिजे असे त्यांनी सांगून कवयित्री राजश्री तुळसणकर यांच्या कविता संग्रहातील कविता गाऊन दाखवल्या तसेच दोन्ही पुस्तकांचे आपल्या भाषणातून विश्लेषण केले.
आपल्या पुस्तकांविषयी कवयित्री व लेखिका राजश्री तुळसणकर यांनी मनोगतातून सविस्तर विवेचन केले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास तुळसणकर कुटुंबीय,नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होते.
Post a Comment