News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

हॉटेलमधील बिलाच्या वादातून तरुणाचा मॅनेजरवर तलवारीने हल्ला; घटना CCTV मध्ये कैद .... कामोठे वसाहतीतील घटना

हॉटेलमधील बिलाच्या वादातून तरुणाचा मॅनेजरवर तलवारीने हल्ला; घटना CCTV मध्ये कैद .... कामोठे वसाहतीतील घटना

पनवेल ( वार्ताहर ) : पनवेलजवळील कामोठे वसाहतींमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.येथील हॉटेलमध्ये घुसून एका तरुणाने तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे.ही घटना कामोठे सेक्टर-६ मधील सरोवर हॉटेलमध्ये घडली आहे.संबंधित तरुण तलवार घेऊन हॉटेलमध्ये घुसला आणि हॉटेल मॅनेजर उमेश शेट्टी यांच्या छातीवर वार केला.त्यानंतर त्याने काउंटरवरही ताबडतोब हल्ला चढवला.

या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला.उपस्थित ग्राहकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव करत पळ काढला.सदर संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,एक दिवस आधी झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.या घटनेमुळे कामोठे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment