पनवेल महानगरपालिकेत स्थायी सभापती व महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निवडीसाठी १८ मार्च रोजी विशेष सभा
पनवेल: पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडीसाठी बुधवार,दि.१८ मार्च २०२६ रोजी विशेष सभांचे आयोजन करण्यात आले आहे.स्थायी समिती सभापती निवडीसाठी दुपारी ४ वाजता पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी ठाणे डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे सभा होणार आहे.
महिला व बालकल्याण समिती सभापती निवड
तसेच महिला व बालकल्याण समिती सभापती निवडीसाठीही दिनांक १८ मार्च २०२६ रोजी, ४:३० वाजता पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी ठाणे डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र विशेष सभा क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह,पनवेल येथे घेण्यात येणार असून समिती सदस्यांमधून सभापतींची निवड करण्यात येईल.
या निवड प्रक्रियेसाठी नामनिर्देशन,छाननी व मतदानाची प्रक्रिया नियमानुसार पार पडणार असल्याची माहिती पनवेल महानगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे.
Post a Comment