ऑटोरिक्षा,टॅक्सी परवान्यांचे खुले धोरणास पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती
रायगड-अलिबाग,(जिमाका):- परिवहन आयुक्त, मुंबई यांच्या कार्यालयात राज्यातील विविध संघटनांकडून ऑटोरिक्षा, टॅक्सी परवान्यांचे खुले धोरण बंद करण्याबाबत विनंती अर्ज प्राप्त झाले असून याबाबत दि.9 मार्च 2026 रोजी मा.परिवहन मंत्री महोदयांनी झालेल्या बैठकीदरम्यान ऑटोरिक्षा,टॅक्सी परवान्यांचे खुले धोरणास स्थगिती देण्याबाबत निर्देश दिल्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,पेण येथील इरदापत्र देण्याचे काम पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहेत अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सुर्यवंशी यांनी दिली आहे.
Post a Comment