महिला सामर्थ्याचा सन्मान ...अपराजिता 2026 ...मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड,रामकी फाउंडेशन आणि आमदार विक्रांत पाटील प्रतिष्ठान यांचा उपक्रम
पनवेल । - आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड,रामकी फाउंडेशन आणि आमदार विक्रांत पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अपराजिता 2026’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ नागरिक सभागृह,पनवेल येथे उत्साहात करण्यात आले.महिलांच्या सामर्थ्याचा सन्मान करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण म्हणजे समुदायातील महिलांसाठी तसेच स्वयं-सहाय्यता बचत गटांसाठी वैयक्तिक आणि समूह उपजीविका पुरस्कारांचे वितरण करण्यात आले तसेच अन्नपदार्थ,आर्टवर्क आणि अपॅरेल्स (वस्त्रनिर्मिती) या विभागांमध्ये उत्कृष्ट उत्पादने तयार करणार्या महिलांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरणासोबतच कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य सादरीकरणे आणि आकर्षक फॅशन शो आयोजित करण्यात आला, ज्याला उपस्थितांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विक्रांत पाटील,मोहिनी विक्रांत पाटील,नगरसेवका स्नेहल पाटील धमाले,रेनुका मलगार आणि विम्मी धीवर उपस्थित होते तसेच मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेडतर्फे सोमनाथ मलगार (डायरेक्टर) उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन आणि समन्वय सतेज डॅनियल धीवर, विकास कुमार आणि जयश्री जाधव यांनी केले.कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंटच्या सुवर्णा तोंडुलकर तसेच विक्रांत पाटील प्रतिष्ठानचे विश्वास शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक म्हणून लायन्स क्लब ऑफ छच कामोठे, माऊली डिझाईन्स कामोठे आणि ओराने इंटरनॅशनल यांनी सहकार्य केले. सपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कोंडुलकर यांनी केले,तर देवदत्त घरत यांनी फॅशन शोचे दिग्दर्शन आणि कोरिओग्राफी केली.
Post a Comment