कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची ITF राष्ट्रीय समन्वय समितीच्या सेक्रेटरीपदी नियुक्ती
पनवेल - इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (ITF) लंडन या बहुराष्ट्रीय संघाच्या भारतीय संलग्न संघटनांची राष्ट्रीय समन्वय समितीची बैठक (NCC) ग्रॅन्ड हॉटेल मुंबई येथे पार पडली.मावळते चेअरमन राजा श्रीधर व सेक्रेटरी अब्दुल गणी सारंग यांचा कार्यकाळ संपल्यामुळे चेअरमन व सेक्रेटरी पदाच्या जागा रिक्त झाल्या.लगेचच नविन राष्ट्रीय समन्वय समिती निवडण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.ITF चे जनरल सेक्रेटरी स्टीफन कॉटन यांनी यावेळी नविन समन्वय समितीची घोषणा केली यामध्ये श्री.शिवगोपाल मिश्रा यांची चेअरमनपदी तर कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्यावर राष्ट्रीय समन्वय समितीच्या सेक्रेटरीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.मिलिंद कांदळगांवकर यांना कोऑर्डीनेटर तर अब्दुल गणी सारंग यांना सहकोऑर्डीनेटर तसेच सिमी लालसिंग यांची महिला प्रतिनिधी,प्रिती सिंग यांची युथ प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली.कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे EB मेंबर म्हणून दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतांना त्यांच्यावर राष्ट्रीय समन्वय समितीच्या सेक्रेटरी पदाची अतिरीक्त जबाबदारी देण्यात आली आहे.त्यामुळे महेंद्रशेठ घरत यांच्या कार्यशैलीचा उचित सन्मान होताना दिसत आहे. या नियुक्तीसाठी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचा स्टीफन कॉटन, अब्दुल गणी सारंग तसेच ITF च्या इतर प्रतिनिधींनी सत्कार केला. त्यांच्या या नियुक्तीसाठी सर्व-स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post a Comment