News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

माजी सरपंच चंद्रकांत भोईर यांना अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हरसिटीतर्फे डॉक्टरेट

माजी सरपंच चंद्रकांत भोईर यांना अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हरसिटीतर्फे डॉक्टरेट

पनवेल - पळस्पे ग्रामपंचायतचे माजी सरपंच,समाजसेवक चंद्रकांत अर्जुन भोईर यांना अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हरसिटीतर्फे गेली ४० वर्षे केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉक्टरेट ही पदवी बहाल केली.एका भव्य समारंभामध्ये ही डॉक्टरेट पदवी चंद्रकांत भोईर यांना बहाल करण्यात आली.
चंद्रकांत भोईर यांचे गेल्या ४० वर्षातील सामाजिक आणि शैक्षणिक काम मोठे आहे.खेळाडू म्हणून कारकीर्द सुरू करून पुढे आदर्श सरपंच व संवेदनशील लोकनेता म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे चंद्रकांत भोईर हे सर्वसामान्य जनतेचे खरे अर्थाने आधारवड ठरले आहेत.सामाजिक बांधिलकी, विकासात्मक दृष्टीकोन, दानशूर वृत्ती आणि माणुसकीची जाणीव यांचा संगम त्यांच्या कार्यात दिसून येतो.त्यांच्या लोककल्याणकारी कार्याला या मानद डॉक्टरेट पुरस्काराने आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे.भोईर यांना मिळालेल्या पदवीबद्दल त्यांचे राजकीय,सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिकस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

हा पुरस्कार स्वीकारताना चंद्रकांत भोईर यांनी,“माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना व जनतेला मी हा सन्मान समर्पित करतो.माझ्या हातून सदैव सत्कर्म घडो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे,”अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment