News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महानगरपालिका निवडणूक ... भाजप महायुतीला ६० तर महाविकास आघाडीला १८ जागा .. धन्यवाद पनवेलकर! -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल महानगरपालिका निवडणूक ... भाजप महायुतीला ६० तर महाविकास आघाडीला १८ जागा .. धन्यवाद पनवेलकर! -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल (प्रतिनिधी) - पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) महायुतीने दणदणीत विजय मिळवत पनवेल महानगरपालिकेवर पुन्हा एकदा एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे.मतदानापूर्वी भाजप महायुतीच्या सहा तर एक अपक्ष जागा बिनविरोध झाली होती.त्यानंतर गुरुवारी ७१ जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल जाहीर झाला.यामध्ये ५३ जागांवर भाजप महायुतीचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होऊन भाजप महायुतीने एकूण ६० जागा जिंकल्या,तर महाविकास आघाडीने १८ जागा जिंकल्या.

या निवडणुकीत महानगरपालिकेच्या प्रथम महापौर राहिलेल्या डॉ.कविता चौतमल,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लीना गरड या विजयी झाल्या तर काँग्रेसच्या लिला कातकरी यांना ( १६०१४ ) सर्वाधिक मते मिळाली.
धन्यवाद पनवेलकर! -आमदार प्रशांत ठाकूर
विजयाचा गुलाल पनवेलकरांना समर्पित 
पनवेलकरांनी विकासाला निवडले!
पनवेलकरांनी शहराच्या प्रगतीला निवडले!
जनतेने महायुतीला दिलेला कौल हा शहराच्या विकासाची नांदी असून,याकरिता पनवेलकरांच्या पुढे कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होतो.धन्यवाद पनवेलकर!
 -आमदार प्रशांत ठाकूर

एकूण प्रभाग - 20, 
एकूण जागा - 78
पक्षनिहाय जागांची संख्या‌....
भारतीय जनता पार्टी - 55
शेतकरी कामगार पक्ष -9
शिवसेना (शिंदे गट)-2
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - 5
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -4
एनसीपी(घड्याळ)-2
अपक्ष - 01

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment