पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज...एकूण ६ ठिकाणी होणार मतमोजणी...सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरूवात होणार
पनवेल : पनवेल महानगरपालिकेसाठी झालेल्या मतदानानंतर आता शुक्रवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरूवात होणार आहे.एकूण 6 ठिकाणी एकाच वेळेस मतमोजणीला सुरुवात होईल.
यासाठी निवडणूक अधिकारी तथा पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.आवश्यकतेनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ तसेच पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला असल्याची माहिती पालिकेचे निवडणूक विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी दिली.
Post a Comment