News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महानगरपालिका निवडणूक ....निवडणुकीसाठी मतदान केंद्र सज्ज.....प्रत्येक मतदान केंद्रावरती मतदान साहित्याचे वाटप ...७८ जागांसाठी २४६ उमेदवार रिंगणात,६५६ मतदान केंद्र

पनवेल महानगरपालिका निवडणूक ....निवडणुकीसाठी मतदान केंद्र सज्ज.....प्रत्येक मतदान केंद्रावरती मतदान साहित्याचे वाटप ...७८ जागांसाठी २४६ उमेदवार रिंगणात,६५६ मतदान केंद्र

पनवेल,दि.14 : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक 15 जानेवारी 2025 रोजी होत असून एकूण 656 मतदान केंद्रावरती निवडणुकीसंबधी सर्व साहित्याचे वाटप आज करण्यात आले आहे.याप्रसंगी सहा निवडणूक कार्यालयांच्या ठिकाणी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मंगेश चितळे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी त्या त्या निवडणूक कार्यालयाचे निवडणुक निर्णय अधिकारी,अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, शहर अभियंता संजय कटेकर,महापालिका अधिकारी उपस्थित होते.
या सहाही ठिकाणी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मंगेश चितळे यांनी मतदान साहित्य वाटपाची पहाणी केली. याबरोबरच मतमोजणीच्या अनुषंगाने  करण्यात आलेली मतमोजणी कक्षाची व्यवस्था, मतदान केंद्रावरील पथके रवाना झाला आहे की नाही याची खातरजमा त्यांनी करून घेतली. तसेच सुरक्षा व्यवस्थेची पहाणी आयुक्तांनी केली. मतदान साहित्य वाटपामध्ये काही अडीअडचणी नाहीत याची शहानिशा आयुक्तांनी करून घेतली.

क्षेत्रीय अधिकारी व प्रशिक्षित मास्टर ट्रेनर
निवडणुकीच्या कामकाजासाठी 69 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून ते आपल्या कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रांवरील कामकाजावर लक्ष ठेवणार आहेत. मतदान यंत्रांसाठी प्रशिक्षित मास्टर ट्रेनरही कार्यरत असणार आहेत.

एकूण मतदार व मतदान केंद्रे ...
पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 5,54,578 मतदार असून त्यामध्ये 2,94,821 पुरुष, 2,59,685 महिला मतदार, तृतीयपंथी 72 मतदारांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी 6 विभागांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापन करण्यात आली असून त्या ठिकाणाहून निवडणूक साहित्याचे वितरण व संकलन आज करण्यात आले. निवडणुकीकरिता एकूण 656 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.एकूण 78 जागांसाठी 246 उमेदवार रिंगणात उभे असून उद्या 15 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7.30 ते 5.30 दरम्यान मतदान होणार आहे. 

 वॉर रूम ....
पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक 15 जानेवारीला एकुण 656 मतदान केंद्रावरती चालणाऱ्या कामकाजावरती एका छताखाली देखरेख करण्यासाठी महापालिकेच्या मुख्यालयामध्ये वॉर रूम स्थापन करण्यात आली असल्याची माहिती निवडणुक उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी दिली आहे.या वॉररूमच्या माध्यमातून वेबकास्टींगच्या माध्यमातून सर्व मतदान केंद्रांचे परीक्षण करणे सोपे जाणार आहे. तसेच मतमोजणी दिवशी मतमोजणी केंद्रावरती लक्ष ठेवले जाणार आहे. 

मतदार यादीत नाव तपासण्यासाठी विशेष लिंक
आगामी पनवेल महानगरपालिका निवडणूक 2025-26 मध्ये प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे.
आपले नाव मतदार यादीत आहे का ते तपासण्यासाठी पुढील लिंकचा वापर मतदार करू शकतात.
 https://panvel.localbody.org/Home/Voter_Search
नाव, वडिलांचे/पतीचे नाव, अडनाव किंवा वोटर आयडी नंबर (EPIC Number) टाकून शोध घेता येईल.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment