पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पनवेलच्या प्रभाग क्रमांक १ मधील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पनवेल महानगराच्या प्रभाग क्रमांक १ मधील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले,रायगड - पनवेल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्याकडे विभागप्रमुख गणेश म्हात्रे व शाखाप्रमुख यांनी आपले राजीनामे दिले आहेत.शिवसेना पदाधिकारी यांना पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये उमेदवारीबाबत विश्वासात न घेता तसेच वारंवार बैठका होऊन सुद्धा प्रभाग क्रमांक १ मधील उमेदवारी ही वरिष्ठ नेत्यांकडून परस्पर त्यांच्या पसंतीच्या उमेदवारास देण्याचे जाहीर करण्यात आली,यामुळे प्रभाग क्रमांक १ मधील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्यावर अन्याय होत असल्याने आम्ही सार्वजनिक राजीनामे देत आहोत.वरील विषयाचा विचार करून आमचे राजीनामे स्वीकारावे अशी विनंती जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांना केली आहे.
Post a Comment