महाविकास आघाडी पनवेल महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढणार - शेकाप नेते बाळाराम पाटील ....मॅरेथॉन चर्चेनंतर जागा वाटप अंतिम टप्प्यात
पनवेल । पनवेलची महाविकास आघाडी ही पनवेल नगरपालिकेची निवडणूक एकत्र लढणार असल्याचे शेकाप नेते माजी आमदार बाळाराम पाटील यांनी बोलताना सांगितले. महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन चर्चेनंतर जागा वाटपही अंतिम टप्प्यात असल्याचे बाळाराम पाटील यांनी सांगितले.शेतकरी कामगार पक्ष,उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,मनसे,समाजवादी पक्ष, रिपब्लिकन चळवळीतले पक्ष,सामाजिक संघटना या सार्यांना सोबत घेवून पनवेलची महाविकास आघाडी पनवेल नगरपालिकेची निवडणूक लढणार आहे.
महाविकास आघाडीतला एक मोठा भाऊ म्हणून आम्हाला त्याग करावा लागला आहे.आमच्या सिटींग जागाही आम्हाला सोडाव्या लागल्या आहेत.आमच्या सार्या सहकारी पक्षांना सोबत घेवून चालावे लागणार म्हणून आम्ही हा त्याग केला आहे. पनवेल नगरपालिकेतील भ्रष्टाचार,जनभावना विरोधात पनवेल महानगरपालिकेचे कामकाज,याला बाजूला करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही पनवेल नगरपालिकेची निवडणूक लढत असल्याचे शेकाप नेते माजी आमदार बाळाराम पाटील यांनी बोलताना सांगितले.
Post a Comment