News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज ...पनवेल महानगरपालिकेच्या २० प्रभागात ७८ जागांसाठी निवडणूक ....७२ तृतीयपंथीयांसह ५,५४,५७८ मतदार आपला बजावणार मतदानाचा हक्क....निवडणूक कामाकरीता ६ निवडणूक निर्णय अधिकारी,६ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, ४५०० कर्मचारी

पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज ...पनवेल महानगरपालिकेच्या २० प्रभागात ७८ जागांसाठी निवडणूक ....७२ तृतीयपंथीयांसह ५,५४,५७८ मतदार आपला बजावणार मतदानाचा हक्क....निवडणूक कामाकरीता ६ निवडणूक निर्णय अधिकारी,६ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, ४५०० कर्मचारी

पनवेल : राज्य निवडणूक आयोगाकडून महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम १५ जानेवारी रोजी जाहिर करण्यात आला आहे.या निवडणुकीत ७२ तृतीयपंथीयांसह ५,५४,५७८ मतदार आपला मतदानाचा हक्क बजानावर आहेत.निवडणूक कामाकरीता ६ निवडणूक निर्णय अधिकारी,६ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली असून ४५०० कर्मचारी अपेक्षित असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितली.

पनवेल महानगरपालिकेसाठी बहुसदस्यीय पद्धतीने २० प्रभागातील ७८ जागांसाठी निवडणूक होणार असून १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी ६ निवडणूक निर्णय अधिकारी आणि ६ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नियुक्त अधिकाऱ्यांमध्ये उपजिल्हाधिकारी,तहसीलदार, अप्पर तहसीलदार तसेच महानगरपालिका व इतर शासकीय विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.प्रत्येक निवडणूक विभागासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रांची व्यवस्था,उमेदवारी अर्जांची छाननी,मतदान,मतमोजणी तसेच आयोगाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे अशा विविध तरतूदींवरती माहिती सांगण्यात आली.

प्रभागनिहाय नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी व 
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी‌....
प्रभाग क्रमांक 1,2,3 चे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भारत वाघमारे (जिल्हाधिकारी –पुर्नवासन, रायगड) यांची नियुक्ती केली आहे तसेच अर्चना प्रधान आणि नितीन राठोड यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

प्रभाग 4,5,6 चे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्ञानेश्वर खुटवड (उपविभागीय अधिकारी) यांची नियुक्ती केली आहे. तसेच संतोष मांढरेआणि नितीन राठोड यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

प्रभाग 7,8,9,10 निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमित शेडगे ( मुद्रांक जिल्हाधिकारी) यांची नियुक्ती केली आहे. नरेश पेढवी, विशाल हुडेकर,यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

 प्रभाग क्रमांक 11,12,13 चे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अविशकुमार सोनोने( उपजिल्हाधिकारी मेट्रो)  यांची नियुक्ती केली आहे. रविंद्र सानप आणि सिध्दार्थ कांबळे यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

प्रभाग 14.15.16 चे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ललिता बाबर( उपायुक्त नवी मुंबई मनपा) ) यांची नियुक्ती केली आहे. जितेंद्र इंगळे आणि सौरभ परभरणकर यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रभाग 17.18 19 ,20 चे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पवन चांडक (उपविभागीय अधिकारी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत फुलपगारे आणि कविता मोकल यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment