जेष्ठ साहित्यिक प्रा.चंद्रकांत मढवी यांच्या अगरायन कथासंग्रहास स्व.नकुल पाटील स्मृती आगरी साहित्य पुरस्कार .... मान्यवरांच्या हस्ते सन्मान
पनवेल - आगरी युथ फोरम,डोंबिवली आयोजित अखिल भारतीय आगरी महोत्सवामध्ये पनवेलमधील जेष्ठ साहित्यिक,कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे संस्थापक अध्यक्ष रायगडभूषण प्रा.अॅड.चंद्रकांत मढवी यांना,त्यांच्या अगरायन या कथासंग्रहास स्व.नकुल पाटील स्मृती आगरी साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल लोकनेते,माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी प्रा.चंद्रकांत मढवी यांचे अभिनंदन केले.
या महोत्सव सोहळयामध्ये आगरी समाजभूषण पुरस्कार तसेच कला,नृत्य अभिनय व विविध क्षेत्रातील प्राविण्य संपादन केलेल्या समाज बाधंवाना आगरी समाज पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे.माजी केंद्रीय मंत्री जगन्नाथ पाटील,अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाद जोशी,९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख,जेष्ठ पत्रकार समन्वयक श्री.राजेंद्र हुंजे,आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाबराव वझे व संमेलाध्यक्ष उपस्थित होते.
Post a Comment