नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव लागावे यासाठी सागरी भूमिपुत्रांचा २२ डिसेंबरला निर्णायक लढा! मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाची मुदत संपली
नवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव लागावे यासाठी साठी सागरी भूमिपुत्रांचा २२ डिसेंबरला निर्णायक लढा पुकारला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय लोकनेते दि.बा. पाटील ह्यांचे नाव लागावे ह्यासाठी गेल्या दशकापासून मागणी करण्यात येत असून गेल्या ४ वर्षात हे आंदोलन अधिक तीव्र झालेले आहे, २४ जून २०२१ रोजी कोविड काळात ही लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरत पाच ही जिल्ह्यातील सागरी भूमिपुत्रांनी आपला रोष व्यक्त करत तत्कालीन सरकारला ह्याची दखल घेणे भाग पाडले होते, त्यामुळे आधी ठाकरे सरकार आणि नंतर आलेल्या महायुती सरकारने कॅबिनेट आणि त्यानंतर विधान सभा आणि विधान परिषदमध्ये नवी मुंबई विमानतळाला राष्ट्रीय लोकनेते दि.बा. पाटील ह्यांच्या नावाचा ठराव मंजूर करून केंद्राकडे पाठवलेला आहे, मात्र केंद्रीय कॅबिनेटमध्ये ठराव न झाल्याने सदर नामांतरण प्रक्रिया थांबून राहिली आहे.
सदर प्रक्रिया सुरू व्हावी ह्यासाठी लक्ष्य वेधण्यासाठी भिवंडी लोकसभेचे सन्मानीय खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे ह्यांनी १४ सप्टेंबर २०२५ रोजी ४ हजारांहून अधिक वाहनांची विशाल वाहन रॅली काढण्यात आली आणि त्यानंतर ६ ऑक्टोबर २०२५ रोजी भव्य अशा जनआक्रोश मोर्चाची हाक देण्यात आली, भूमिपुत्रांचा वाढता रोष पाहता सन्मानीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी २ ते अडीच महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन विमान उडण्या आधी दिबांचे नाव लागेल असे आश्वासन ३ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या सह्याद्री अतिथी गृह येथील बैठकीत आश्वासित केल्याने ६ ऑक्टोबर रोजीचा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आलेला होता.
येत्या ३ डिसेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाची मुदत संपत आहे, आणि २५ डिसेंबर २०२५ रोजी नवी मुंबई विमानतळावरून उडाण सुरू होणार आहेत, त्यामुळे नामांतरासाठी निर्णायक आंदोलनाची वेळ येऊन ठेपली असल्याने, त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी पाच ही सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्र संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक माणकोली भिवंडी येथे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे ह्यांच्या पुढाकाराने बोलावण्यात आलेली होती.
ह्यावेळी सरकार सागरी भूमिपुत्रांना गांभीर्याने घेत नसेल आणि दिबा साहेबांचे नाव विमानतळाला लावण्यासाठी टाळाटाळ करत असेल तर आक्रमक पवित्रा घेतल्या शिवाय पर्याय नाही,आणि एक निर्णायक आणि बेमुदत आंदोलन करावे असे एकमताने ठरवले गेले.
त्यावर खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे ह्यांनी फक्त भिवंडीतूनच १५ ते २० हजार आंदोलक घेऊन पायी मोर्चा २२ डिसेंबर २०२५ ह्या तारखेला निघेल आणि पाच ही जिल्ह्याचे मिळून किमान लाख भर भूमिपुत्र ह्या मोर्चात सहभागी होतील असा विश्वास आणि तसे नियोजन स्पष्ट केले.२२ तारखेला निघणारा हा मोर्चा २४ तारखेला नवी मुंबई विमानतळावर पोहोचेल आणि तो पर्यंत नाव न लागल्यास बेमुदत विमानतळ बंद आंदोलन सुरू ठेवण्यात येईल असे घोषित केले.
ह्यावेळी ठाणे, भिवंडी,वसई, कल्याण डोंबिवली,नवी मुंबई,मुंबई, मुंबई उपनगर,उरण,पनवेल,पेण ह्या भागातून संघटना प्रतिनिधी उपस्थित होते आणि सर्वांनी विभाग निहाय जबाबदारी स्वीकारून आपापल्या तालुक्यातील प्रत्येक गावातून अधिकाधिक भूमिपुत्रांना आंदोलनात सामील करून घेण्याचा आणि आंदोलन यशस्वी करण्याचा विश्वास व्यक्त केला.
त्यांनतर बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे लागलीच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या विमानतळ नामांतरणसाठी च्या “जन आक्रोश मोर्चाची” घोषणा करण्यात आली.
सुरेश रेखा गोपीनाथ म्हात्रे (बाळ्यामामा)
खासदार- भिवंडी लोकसभा
प्रमुख विश्वस्त- श्री एकवीरा देवस्थान
अध्यक्ष- धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट
समन्वयक- सीए निलेश ज्ञानेश्वर पाटील
संपर्क - ९९२०२८२८२०
Post a Comment