दुबार मतदारांबाबत तपासणी करून मतदार यादी निर्दोष करणेबाबत पनवेल महापालिका प्रयत्नशील
पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता तयार करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीतील संभाव्य दुबार नावाबाबत तपासणी करून मतदार यादी निर्दोष करण्यासाठी आज आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामठे व निवासी नायब तहसिलदार संभाजी शेलार यांनी सर्व 461 मतदान केंद्र स्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण दिले आहे. यावेळी उपस्थित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.), पर्यवेक्षक, महानगरपालिका कर्मचारी यांना मतदार यादीतील दुबार नावे बी.एल.ओ.ॲपच्या मदतीने शोधून सदर मतदार दुबार असलेबाबत खात्री करणे विषयक सूचना देण्यात आल्या.
मा. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दुबार मतदारांबाबत करावयाच्या कार्यवाहीविषयी सूचना देण्यात आल्या आहेत.त्यानुसार महानगरपालिका हद्दीतील एकूण 461 मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून मतदार याद्या अधिकाधिक निर्दोष करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.याचउद्देशाने महापालिकेने पुढाकार घेऊन हे प्रशिक्षण घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या.प्रारुप मतदारयादीच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना यांची पडताळणी करून व मा.राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन मतदार याद्या निर्दोष करण्यासाठी सर्वतोपरी कार्यवाही करणार असल्याचे निवडणूक विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी सांगितले आहे.
प्रारूप मतदार यादीवरील प्राप्त हरकती व सूचना तसेच दुबार मतदारांबाबत तपासणी करून मतदार याद्या अधिक निर्दोष होतील यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे.
मंगेश चितळे,
आयुक्त तथा प्रशासक,
पनवेल महानगरपालिका
Post a Comment