ओरायन मॉलमध्ये असंभव मराठी चित्रपटाचा विशेष प्रीमियर शो ... चित्रपटाचे अभिनेते,अभिनेत्री यांच्या टीमसह लोकप्रतिनिधी,मान्यवर,ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर व व्यावसायिक संजय पोतदार या चित्रपट सहनिर्मात्यांची उपस्थिती
पनवेल:पनवेल शहरातील एकमेव मॉल असलेल्या ओरायन मॉलमध्ये असंभव या मराठी चित्रपटाचा विशेष प्रीमियर शो थाटामाटात पार पडला.यावेळी असंभव चित्रपटाची स्टारकास्टसह पनवेल शहरातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती.मराठी अभिनेत्यांना पाहण्यासाठी शहरात मोठी गर्दी झाली होती.
ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर,प्रसिद्ध व्यावसायिक संजय पोतदार हे या चित्रपटाचे सहनिर्माते यावेळी उपस्थित होते.यांच्यासह अभिनेते सचित पाटील,पुष्कर क्षोत्री,मुक्ता बर्वे,नितीन वैद्य,तेजस देसाई,शर्मिष्ठा राऊत आदींसह या प्रीमियरला आ.प्रशांत ठाकूर,आ.विक्रांत पाटील,भाजप नेते बाळासाहेब पाटील,माजी सभागृह नेते परेश ठाकूर,शिंदे सेनेचे नेते चंद्रशेखर सोमण,उद्योजक विजय लोखंडे आदींसह शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.यावेळी पनवेलकरांसाठी असंभव चित्रपटाचे विशेष शोचे देखील आयोजन करण्यात आले होते.या शोला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.चित्रपटाच्या स्टारकास्टने यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.या चित्रपाटाचा गोवा येथे होणाऱ्या इफ्फि 2025 आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाल्याने देखील उपस्थितांनी चित्रपटाच्या स्टारकास्ट आणि निर्मात्यांचे अभिनंदन केले.
Post a Comment