News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

भाजपा नेते प्रितम म्हात्रेंच्या यशस्वी पाठपुराव्याने रसायनी कॉर्नर ते डिंपल कंपनी रस्ता नूतनीकरण कामाला सुरुवात

भाजपा नेते प्रितम म्हात्रेंच्या यशस्वी पाठपुराव्याने रसायनी कॉर्नर ते डिंपल कंपनी रस्ता नूतनीकरण कामाला सुरुवात

पनवेल – ग्रामपंचायत तुराडे परिसरातील रसायनी कॉर्नर ते डिंपल कंपनी या महत्वाच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाला आज अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीनंतर आणि वाहतूक तसेच जनजीवनावर परिणाम करणाऱ्या रस्त्याच्या अत्यंत खराब परिस्थितीची दखल घेत,भाजपा नेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा व यशस्वी मध्यस्थीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्काळ कामाला प्रारंभ झाला.

यापूर्वी श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. ०१ पनवेल–रायगड यांना लेखी स्वरूपात स्मरणपत्र देत रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत तातडीने लेखी आश्वासन देण्याची मागणी केली होती. त्यानंतर झालेल्या पाठपुराव्यानंतर आज प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

काम सुरू होण्याच्यावेळी मा.पंचायत समिती सदस्य श्री जगदीश पवार,ग्रामपंचायत तुराडेचे मा.सरपंच रंजना विश्वनाथ गायकवाड ,रिया प्रदीप माळी ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

"जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेऊन समस्या निकाली लावणे ही आमची कार्यपद्धती आहे. ग्रामपंचायत तुराडेचे मा. सरपंच रंजना विश्वनाथ गायकवाड , रिया प्रदीप माळी यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने आम्ही संबंधित विभागाशी सतत संपर्क ठेवून हे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करून आज थांबलेल्या कामाची सुरुवात झाली आहे. लवकरच नियोजित वेळेत सदरचे काम पूर्ण होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत"
—भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे
मा. विरोधी पक्षनेते, 
(पनवेल महानगरपालिका)

या कामामुळे रसायनी परिसरातील वाहतूक सुलभ होण्यासोबतच नागरिकांना होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पुढील काही दिवसांत संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment