प्रारूप मतदार यादीवर हरकतीच्या मुदत वाढीसाठी कॉंग्रेस पक्षातर्फे पनवेल आयुक्तांना पत्र
पनवेल - प्रारूप मतदार यादीवर हरकत घेण्यासाठी मुदत वाढ द्यावी अशी मागणी आज कॉंग्रेस पक्षातर्फे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांना पत्र देऊन केली.
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक संदर्भात प्रारूप मतदार यादी व हरकती हि दि. २०/११/२०२५ रोजी प्रसिद्ध झाली व प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दखल करण्याचा अंतिम दिनांक २७/११/२०२५ रोजी आहे.तरी प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी व मतदारांकडे पोचण्यासाठी हे कालावधी खूप कमी असल्याने या कालावधीत आपण मुदत वाढ करावी असे पत्र पनवेल कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष सुदाम पाटील,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हरेश केणी व समजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक यांच्या उपस्थितीत आयुक्तांना पत्र देण्यात आले.
Post a Comment