पनवेलच्या मध्यवर्ती ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या प्रशासकीय भवनाची दयनीय अवस्था...प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन कार्यवाही करावी...स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांच्यासह शिवसेनेचे निवेदन
पनवेल - पनवेलच्या मध्यवर्ती ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या प्रशासकीय भवनाची दयनीय अवस्था झाली असून प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदन स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांनी प्रशासनाला दिले आहे.
अस्वच्छ प्रसाधनगृहे, बंद लिफ्ट, थुंकले ओकलेल्या भिंती, पिण्याच्या पाण्याची टंचाई, प्रचंड अस्वच्छता आणि अपुरी सुरक्षा यामुळे सामान्य नागरिकांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत.प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष देऊन कार्यवाही करावी, स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शिवसेनेने उपविभागीय (प्रांत) अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देऊन या अनागोंदीवर तीव्र निषेध नोंदवला आहे.
कारण सार्वजनिक बांधकाम विभागाने ही इमारत महसूल खात्याकडे हस्तांतरित केली आहे. विकसनशील पनवेल तालुक्यासाठी ही दुरवस्था लज्जास्पद आहे! प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष देऊन कार्यवाही करावी आणि इमारतीची योग्य देखभाल करावी.अन्यथा, शिवसेनेच्या पद्धतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही दिला आहे. प्रांताधिकारी पवन चांडक हे अतिशय संवेदनशील अधिकारी असून त्यांनीही याची गंभीर दखल घेऊन लवकरच सर्व खात्यांची संयुक्त बैठक लावून या विषयावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी महानगर प्रमुख या नात्याने मी व माझ्यासह महानगर संघटक मंगेश रानावडे, उपमहानगर प्रमुख महेश सावंत, शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, संघटक अभिजीत साखरे, उपशहर संघटक खंडेश धनावडे व इतर प्रमुख शिवसैनिक उपस्थित होते.
#पनवेल #शिवसेना #चंद्रशेखरसोमण #प्रशासकीयभवन #नागरिकांचीपरवड #आंदोलन #पनवेलविकास
Post a Comment