येत्या तीन महिन्यांमध्ये विमानतळाच्या नामकरणासंदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई - नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते,लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव दिले जाणार आहे,येत्या तीन महिन्यांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय कृती समितीला दिली आहे.याबाबत आमदार प्रशांत ठाकूर प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले की,लोकनेते दि.बा.पाटील यांच नाव विमानतळाला लागलं पाहिजे ही मागणी भूमिपूत्र आणि प्रकल्पग्रस्तांची होती.दरम्यान ज्या लोकांचा आंदोलनाशी संबंध नाही ते या प्रकरणात संभ्रम पसरवत गेले, त्यामुळे थोडा संभ्रम झाला होता,असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.या बैठकीला सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment