संपूर्ण कामोठ्याला पाणी मिळाल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही .....पाणीटंचाई विरोधात भाजपाचे ठाम आंदोलन
पनवेल -पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा कामोठे मंडळ अध्यक्ष श्री. विकास नारायण घरत यांच्या नेतृत्वाखाली कामोठे शहरातील वाढत्या पाणीटंचाईविरोधात सेक्टर ६, कामोठे,जल विभाग कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, महिला मोर्चा,युवा मोर्चा, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.नागरिकांच्या वेदनांना वाचा फोडत प्रशासनाला जाब विचारण्यात आला आणि ठाम मागणी करण्यात आली."संपूर्ण कामोठ्याला पाणी मिळाल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही!"या ठाम भूमिकेमुळे अखेर सिडको प्रशासनाने लेखी स्वरूपात आश्वासन दिले की उद्यापासून कामोठ्यात नियमित पाणीपुरवठा सुरू होईल.
Post a Comment