दिवाळीतील प्रकाशाच्या उत्सवात पनवेलचा टिळक रोड परिसर केदार बिल्डकॉनमुळे उजळला ....
पनवेल - दिवाळी सणाच्या पार्श्ववभूमीवर सर्वत्र झगमगाट सुरु आहे, दिव्यांची आकर्षक रोषणाई ही आता पनवेलची एक वेगळी ओळख होत असतानाच पनवेल शहरातील टिळक रोड परिसर हा बांधकाम व्यवसायातील सुप्रसिद्ध केदार बिल्डकॉनमुळे झगमगला असून अनेकजण या ठिकाणी उभे राहून या रोषणाईचा आनंद घेत आहेत तर तरुण वर्ग सेल्फी व व्हिडिओ काढून आपला आनंद द्विगुणित करीत आहेत.
या भागात अंत्यत मोठी व जुनी अशी यशोमंगल सोसायटीचे नुकतेच पुनर्विकासाचे काम सुरु झाले आहे. या ठिकाणी पियुषभाई यांचे कार्यालय असलेले केदार बिल्डकॉनने ही सोसायटी डेव्हलप करायला घेतली आहे.इतर बांधकाम व्यवसायिक हे फक्त आपल्या बिल्डिंगचे बांधकाम बघतात परंतु केदार बिल्डकॉन हे कधीच व्यवसाय न पाहता सामाजिक बांधिलकी जपत परंपरागत सण उत्सव सुद्धा साजरे करतात.या उद्देशानेच आज दिवाळीच्या सणानिमित्त यशोमंगल सोसायटी परिसर हा केदार बिल्डकॉनच्या माध्यमातून पूर्ण रोषणाई करून त्यांनी आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे. या भागातील नागरिक तसेच इतर अनेकजण या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई पाहण्यासाठी येथे गर्दी करीत आहेत व केदार बिल्डकॉनचे कौतुक करत आहेत.आकर्षक बांधकाम,वाजवी दर व ग्राहकाचे समाधान या तत्वावर केदार बिल्डकॉनचे पनवेल शहर, नवीन पनवेल, वाशी, मुंबई या ठिकाणी मोठं मोठे प्रोजेक्ट कार्यन्वित आहेत.
Post a Comment