सुकापुर ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी दिव्येश दत्तात्रय (बुवाशेठ) भगत
पनवेल - सुकापुर ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी भाजपचे दिव्येश दत्तात्रय (बुवाशेठ) भगत यांनी आपला पदभार आज स्विकारला.यापूर्वी दिव्येश भगत हे सुकापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच होते.
आपला प्रभारी सरपंचपदाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांचे, माजी नगरसेवक एडवोकेट मनोज भुजबळ,राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुरदास गोवारी,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव,माजी उपसरपंच बुवाशेठ भगत,माजी सरपंच योगिता पाटील,माजी उपसरपंच अशोक पाटील,ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, चंद्रकांत पोपटा,आत्माराम पाटील, पुष्पा महस्कर,भाजपाचे यतीन पाटील तसेच श्याम ठाकूर,महेश पाटील,शांताराम भगत,किशोर सुरते,दीपक भगत,दिलीप भगत डॉक्टर देसाई,आदित्य भगत युवा मोर्चा आदींनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
Post a Comment