News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पूरग्रस्त बांधवांसाठी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे मदतीचे आवाहन

पूरग्रस्त बांधवांसाठी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे मदतीचे आवाहन

पनवेल : राज्यातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे.शेतकरी ते विद्यार्थी सर्वांवरच या आपत्तीचे गंभीर परिणाम झाले असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. राज्य सरकार आणि प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असले तरी सामाजिक संस्थाही या संकटाच्या काळात पुढे सरसावत आहेत.

याच पार्श्वभूमीवर पनवेलमधील भाजपा नेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्यातर्फे पूरग्रस्त बांधवांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी सांगितले की, “एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत एका लहान चिमुरडीने माझे शालेय साहित्य वाहून गेले, मला जगायचे आहे अशी साद व्यक्त केली. त्या चिमुरडीचे शब्द ऐकून मन हेलावले. अशा परिस्थितीत पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीची आज अत्यंत गरज आहे.”

यासाठी संस्थेच्या माध्यमातून शालेय साहित्य, वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिली, बॅग आदी वस्तू तसेच आवश्यक जीवनोपयोगी वस्तू दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

श्री. म्हात्रे यांनी पुढे सांगितले की, “आपल्या छोट्याशा मदतीनेही एखाद्या कुटुंबाला जगण्याची नवी दिशा मिळू शकते. चिमुरड्यांचे शिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.”

पूरग्रस्तांना मदतीचा हात देताना पनवेल परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन  संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.

“महापुराच्या पाण्यानं शेतकऱ्याची पिकं वाहून गेली…
आशा-स्वप्नं ढगांमध्ये विरून गेली,पण तरीही शेतकरी थांबला नाही. तो पुन्हा शून्यातून नव्याने उभं राहतोय. अशावेळी त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी शक्यतोपरी सर्व सहकार्य करण्यासाठी माझ्यासारख्या असंख्य लोकांनी पुढे येऊन आपले कर्तव्य बजावले पाहिजे या भावनेतून माझी जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था वस्तू स्वरूपात मदतरणारच आहे परंतु त्यासोबत अनेक दानशूर व्यक्ती आणि सेवाभावी संस्था सुद्धा यात सहभागी होत आहेत" 
श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे 
अध्यक्ष 
जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment