News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

उलवे येथे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात साजरा

उलवे येथे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात साजरा

पनवेल (प्रतिनिधी)-  पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था घडवली आणि त्यांचा आदर्श घेऊन घडलेल्या वासरदारांनी ही संस्था मोठी केली असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी उलवे येथे कार्यक्रमात केले तसेच येत्या काळामध्ये सौ.शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल हे नवी मुंबईतील प्रथीतयश स्कूल म्हणून उज्वल यश संपादन करणार असा विश्वास व्यक्त करून कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श घेऊन आपण पुढे मार्गक्रमण करायचे आहे असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

उलवे येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ.शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल सीबीएससी व मराठी माध्यम विद्यालयाच्यावतीने पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ जयंती आणि पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला.हा सोहळा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.या कार्यक्रमाला संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी.देशमुख,जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत,प्रमुख वक्ते दिनेश सासवडे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्या ज्योत्स्ना ठाकूर,सीबीएसई विद्यालयाचे चेअरमन परेश ठाकूर, मराठी विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर,अनंता ठाकूर,स्थानिक स्कुल कमिटी सदस्य निलेश खारकर, कविता खारकर,धीरज ओवाळेकर,राजेश खारकर यांच्यासह शिक्षक,विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख वक्ते दिनेश सासवडे यांनी कर्मवीर अण्णांच्या जीवनप्रवासाचे वर्णन आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आदर्श लोकांनी घ्यावा असे प्रतिपादन करत कर्मवीरांचे खरे वारसदार म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शब्दसुमनांनी कौतुक केले.या सोहळ्यामध्ये दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला तसेच सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना विविध बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment