नाट्यप्रयोगद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व .. इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलचा उपक्रम
पनवेल - इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलतर्फे रायगड जिल्हा परिषद शाळा आसुडगाव,आदिवासी आश्रम शाळा चिखले,आणि शांतीवन स्कूल नेरे येथे नाट्यप्रयोगद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.या नाटकाचा उद्देश किशोरवयीन मुला-मुलींना लहान वयात लग्न न करता शिक्षणाला प्राधान्य द्यावे हा होता.
नाटकात लहान वयातील विवाहाचे दुष्परिणाम,शिक्षणामुळे मिळणारे स्वावलंबन, सन्मान व उज्वल संधी अधोरेखीत करण्यात आली.विशेषकरून आदिवासी भागातील मुलींना शाळा सोडून द्यावी लागतेते होऊ नये हा संदेश नाटकातून देण्यात आला.या नाटकाची संकल्पना आणि डायरेक्शन मीना नाईक ह्याचीआहे.तिन्ही शाळेत इनरव्हीलच्या प्रेसिडेंट भूमिका परमार,पास्ट प्रेसिडेंट कल्पना कोठारी,अर्चना राजे राजश्री नाईक,कल्पना लोखंडे,स्नेहल वाडकर,साधना धारगळकर आणि ॲड.जयश्री दाभोळकर उपस्थित होते.
Post a Comment