पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका २०२५ साठीच्या प्रारूप रचनेवरील सुनावणी संपन्न
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या २०२५ च्या सार्वजनिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोग यांनी मान्यता दिलेली आहे.उपसचिव नगर विकास विभाग यांच्याकडील पत्रानुसार दिनांक ३ सप्टेंबर २०२५ ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती व यावरील हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या.त्यानुसार आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी घेण्यात आली.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवरती एकुण 282 हरकतीं आल्या होत्या.विहित वेळेत उपस्थित राहिलेल्या अर्जदारांच्या सर्व 101 हरकतींवरती सुनावणी घेण्यात आली.
Post a Comment