पनवेलमधील भाजी विक्रेत्यांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन
पनवेल (प्रतिनिधी) पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधून पनवेल तालुका प्रेस क्लब आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील भाजीविक्रेत्यांसाठी येत्या १९ सप्टेंबर रोजी "महाआरोग्य शिबिराच"आयोजन करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिरात भाजी विक्रेत्यांना आयुष्यमान भारत डिजिटल मिशन कार्ड (ABDM) ,पंतप्रधान जनआरोग्य योजना (PMJAP) अंतर्गत नोंदणी आणि आयुष्यमान वयोवंदना कार्डच वाटप करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे नेत्र तपासणी,बालरोग,स्त्रीरोग,सर्जन,अस्थिरोग,फिजिशियन, मधुमेह,उच्चरक्तदाब,हाडचिकित्सा,दंतचिकित्सा या सर्व तपासण्यांबरोबर सर्व प्रकारचे औषध आणि रक्ताच्या चाचण्या देखील मोफत करण्यात येणार आहेत.
या शिबिरासाठी प्रमुख पाहून म्हणून पनवेल विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे,आमदार विक्रांत पाटील,भाजपा नेते प्रीतम म्हात्रे,मा.नगरसेविका सौ दर्शना भोईर,शिवसेना पनवेल महानगर प्रमुख ॲड.प्रथमेश सोमण,अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर तसेच रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांची प्रमुख उपस्थिती असेल.या कार्यक्रमाचे आयोजन पनवेल जुने भाजी मार्केट, पंचमुखी मारूती मंदिर या ठिकाणी सकाळी ठिक ११.०० वा. करण्यात आले आहे.या महाआरोग्य शिबिराचा सर्व भाजी विक्रेत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन पनवेल तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे आणि सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
Post a Comment