अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आपत्कालीन मदत यंत्रणा कार्यरत .....सर्व यंत्रणेने सुसज्ज व दक्ष रहावे - आयुक्त मंगेश चितळे
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात रविवारी रात्रीपासून ते सकाळ पर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टी झाली.या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर असून पाणी साठणाऱ्या भागावरती अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.यासाठी मदत यंत्रणेने सुसज्ज व दक्ष रहावे असे निर्देश आयुक्त मंगेश चितळे यांनी दिले आहेत.
पनवेल महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी ऑन डयूटी 24 तास आपत्ती व्यवस्थापन करत आहेत. ज्या ज्या ठिकाणी पाणी साचले आहे,त्या त्या ठिकाणी पंप लावून पाणी काढण्यात आले.पाणी साठलेल्या भागातील नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले.आयुक्तांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना चोवीस तास सतर्कता बाळगण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.दरम्यान अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी कळंबोली येथील पंप हाऊसची पाहाणी केली. तसेच सुकापुर,नवीन पनवेल येथे होल्डिंग पॉईंटची परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे , उपायुक्त वैभव विधाते, आरोग्य विभाग प्रमुख अनिल कोकरे, विद्युत विभाग प्रमुख प्रीतम पाटील , मुख्य आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे यांनी प्रत्यक्ष पहाणी केली.
दरम्यान पाणी साठलेल्या भारत नगर,पनवेल येथील नागरिकांना कोळीवाडा शाळेत स्थलांतरीत होणेबाबत जाहीर आवाहन केल्यानंतर,कोळीवाडा शाळेमध्ये १८९ स्थलांतरित करण्यात आले. तसेच पटेल मोहल्ला,कच्छी मोहल्ल्यातील सुमारे १५५ नागरिकांना पालिकेच्या उर्दू शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
स्थलांतरितांची सर्व व्यवस्था....
या ठिकाणी चहा ,जेवण, आरोग्य सेवा व पाण्याची सोय पनवेल महानगरपालिका तर्फे करण्यात आली आहे. तसेच वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने मदत सुरू करण्यात आली आहे.परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांनी उर्दू शाळा येथे भेट दिली व स्थलांतरित केलेल्या नागरिकांची विचारपूस केली व त्यांना देण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला तसेच कोळेश्वर शाळा येथे उपायुक्त रविकिरण घोडके यांनी येऊन समक्ष पाहणी करून जेवण नाश्ता सर्वांना मिळाले की नाही याबाबत चौकशी केली.
पाणी ओसरल्यानंतर सर्वत्र घनकचरा व आरोग्य विभागाच्यावतीने साफसफाईची कामे वेगाने करण्यात येत आहेत.
नागरिकांना सूचना....
मुसळधार पाऊसात नागरिकांनी धोकादायक इमारतीमध्ये आसरा घेऊ नये तसेच झाडे होर्डिंग्ज खाली उभारू नये असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. नागरिकांची सुरक्षितता व काळजी घेण्यासाठी महापालिका तत्पर असून कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. महापालिकेच्या सर्व विभागांनी आयुक्तांच्या निर्देशानुसार आपापसात योग्य समन्वय ठेवून "अलर्ट मोड' वर काम करावे, योग्य नियोजन करून उपाययोजना कराव्यात,अशा सूचना दिल्या आहेत.
Post a Comment