ग्रामीण भागातील कवी संमेलने कोमसापच्या उपक्रमांना बळ देणारी - रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील ... अलिबाग येथे उरण कोमसापचे कवी संमेलन
पनवेल - ग्रामीण भागातील कवी संमेलने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या उपक्रमांना बळ देणारी असल्याचे मत कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्कप्रमुख रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील यांनी अलिबाग येथे उरण कोमसापतर्फे आयोजित केलेल्या कवी संमेलनाच्यावेळी व्यक्त केले.
अलिबाग तालुक्यातील भाकरवड येथे गणोत्सवानिमित्त झालेल्या कवी संमेलनास रायगड जिल्हा कोमसापचे अध्यक्ष संजय गुंजाळ,केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी,जेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार ह.भ.प.जगन्नाथ राऊत,मनस्वी मानव सेवा अध्यक्ष जीवन पाटील,उरण कोमसापचे अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे,इंडिया झिंदाबाद फ्रेंड्स ग्रुप रायगडचे कार्याध्यक्ष रमेश थवई आदी उपस्थित होते.यावेळी कोमसापचे अध्यक्ष संजय गुंजाळ यांनी आपल्या भाषणात,रायगड जिल्ह्यात अधिकाधिक साहित्य उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त करत गणेशोत्सव म्हटलं की,आज वेगवेगळ्या पद्धतीने मनोरंजन केले जात आहे परंतु उरण कोमसाप शाखेने साहित्यिक,कवींसाठी आयोजित केलेल्या कवी संमेलनाचे कौतुक केले.
या कवी संमेलनात अनिल भोईर,रमेश थवई,अजय शिवकर,
मोहनलाल पाटील,दिलीप पाटील, नरेश पाटील,अनुज शिवकर,महेंद्र पाटील,मच्छिंद्र म्हात्रे,गौरीश पाटील,मोहन पाटील,केशव म्हात्रे,दिपक गावंड आदींनी आपल्या वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे आयोजन नरेश पाटील यांनी केले होते.नवनिर्वाचित रायगड जिल्हा कोमसापचे अध्यक्ष संजय गुंजाळ,केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी यांचा आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कोमसाप उरण शाखेचे अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे यांनी केले
Post a Comment