News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

कोमसाप रायगड जिल्हा अध्यक्षपदी संजय गुंजाळ ... केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी म्हणून गणेश कोळी यांची निवड

कोमसाप रायगड जिल्हा अध्यक्षपदी संजय गुंजाळ ... केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी म्हणून गणेश कोळी यांची निवड

पनवेल - कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्ह्याच्या अध्यक्षपदी संजय गुंजाळ तर केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी म्हणून गणेश कोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

रायगड जिल्ह्यातील रोहा येथे झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्ह्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली,त्यामध्ये अध्यक्ष : संजय गुंजाळ,केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी : गणेश कोळी,उपाध्यक्ष : पुरुषोत्तम मुळे,कार्यवाह: संजय होळकर, कार्याध्यक्षा : रेखा कोरे,कोषाध्यक्ष: एड.गोपाळ शेळके,जिल्हा समन्वयक: सुखद राणे तर कार्यकारिणी सदस्य :श्री धनंजय गद्रे,श्री सुभाष कुडके,श्री मच्छिंद्र म्हात्रे,श्री रामजी कदम,सौ प्रविता माने,श्री रमेश धनावडे,श्री गंगाधर साळवी,सौ ज्योत्स्ना राजपूत,लवेंद्र मोकल तर महिला प्रमुख : सौ संध्या दिवकर युवाशक्ती प्रमुख : सिद्धेश लखमदे यांची निवड झाली.उर्वरित कार्यकारणीतील पदाधिकारी व सदस्यांची नावे लवकरच जाहीर करण्यात येतील.कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्कप्रमुख रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील यांनी नूतन कार्यकारिणीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment