महाराष्ट्राची हास्य जत्रेतील संगीतकार अमीर हाडकर यांच्या घरी गणपतीसाठी अवतरली पंढरी
पनवेल (प्रतिनिधी ) सोनी मराठी वाहिनीवर लोकप्रिय महाराष्ट्राची हास्य जत्रामधील रायगड जिह्याचे सुपुत्र संगीतकार अमीर हाडकर यांच्या घरी यंदाच्या वर्षी शुटिंग मधना वेळ काढून इकोफ्रेंडली असं सुरेख गणपतीची आरास केली केली असून सोबत मूर्तीला विठ्ठलाचे रूप दिले असून साक्षात घरी पंढरी अवतारल्याने वातावरण भक्तिमय झाले आहे.
तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाची मूर्ती देखील मातीची असून वेदांत अंबुकर याने साकारली आहे.यंदाची मूर्ती विठ्ठलाच्या आभासी रूपात आहे.ती आम्ही घरीच बनवतो.माझा भावाचा मुलगा वेदांत मूर्ती घडवतो.यंदा तर त्याने सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांची मूर्ती देखील घडवली असल्याचे हाडकर यांनी सांगितले.आमच्या मूर्तित विठ्ठलाचे आभासी रूप असल्या कारणाने पूर्ण कुटुंबाने वारकरी वेष परिधान करून बाप्पाचे स्वागत केले आणि गणेशा च्या वारीत सहभागी झालो.
Post a Comment