News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महानगरपालिकेच्यावतीने दोन बहुमजली वाहनस्थळ निर्मितीचा प्रकल्प .... वाहतुक कोंडीवर प्रभावी उपाय - आयुक्त मंगेश चितळे ....१२१ कोटींच्या प्रकल्पाच्या दोन्ही वाहन संकुलामध्ये ५१० दुचाकी तर ३४५ चार चाकी वाहनांची पार्किंग सुविधा

पनवेल महानगरपालिकेच्यावतीने दोन बहुमजली वाहनस्थळ निर्मितीचा प्रकल्प .... वाहतुक कोंडीवर प्रभावी उपाय - आयुक्त मंगेश चितळे ....१२१ कोटींच्या प्रकल्पाच्या दोन्ही वाहन संकुलामध्ये ५१० दुचाकी तर ३४५ चार चाकी वाहनांची पार्किंग सुविधा

पनवेल  :- अतिशय वेगाने विकसित होत असलेले पनवेल शहर हे बाजारपेठेसाठी सुप्रसिद्ध असे आहे. आसपासच्या परिसरातील नागरिक पनवेल मध्ये खरेदीसाठी येतात. पार्किंगची समस्या असल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होते.ही वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी  पनवेल महानगरपालिकेने दोन बहुमजली वाहनस्थळ (पार्किंग) निर्माण करण्याचा महत्त्वाकांक्षी बहुउद्देशीय  प्रकल्प हाती घेतला आहे. 23 हजार 737 चौरस मीटर क्षेत्रफळ असणारे दहा व बारा मजली पार्किंग संकुल बांधण्यात येत आहे. काम सुरू झाल्यापासून दोन वर्षात हे प्रकल्प पूर्ण होतील. अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी दिली आहे.

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या पुढील बाजूस व प्रभाग कार्यालय ड इमारतीच्या बाजूस येथे हे दोन  बहुमजली पार्किंग स्थळ उभारण्यात येत आहेत यासाठी प्रस्ताव सल्लागार म्हणून मे. डिझाईनो आर्किटेक्स अँड प्लॅनर्स  या संस्थेची नेमणूक केली आहे.

 दहा व बारा मजली संकुल‌...
सुमारे 70 कोटी 85 लाख 56 हजार 561 रुपये खर्चाचे हे 10 मजली संकुल असणार आहे. तळघर एक मध्ये 207 दुचाकी, तळघर दोन मध्ये 29 चार चाकी, तळमजला 12 व्यावसायिक दुकाने, पहिला मजला 18 व्यावसायिक दुकाने, दुसरा ते सहावा मजला प्रति मधला 28 चार चाकी प्रमाणे 140 चार चाकी वाहने, तसेच सातवा मजला 26 चार चाकी  वाहन पार्किंग क्षमता असणार आहे. आठव्या व नवव्या मजल्यावर सभागृह असून त्याची आसनक्षमता 282 आहे. याखेरीस दहाव्या मजल्यावर बहुउद्देशीय सभागृह ज्याची आसनक्षमता 500 अशी आहे.

तर बारा मजली संकुलात तळघर क्रमांक एक मध्ये 121 दुचाकी वाहन, तळघर क्रमांक दोन मध्ये 142 दुचाकी वाहन, तळमजला व पहिला मजल्यावर अनुक्रमे 59 व 56 व्यावसायिक दुकाने, 8:ऑफिस साठी जागा, तिसरा ते बारावा मजला यामध्ये प्रति मजला 4 दुचाकी व 15: चार चाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था, याखेरीज  मोठे भव्य टेरेस असणार आहे.

    बहुउद्देशीय व्यवस्था ...
साधारणतः 121 कोटींचे हे प्रकल्प आहेत.या दोन्ही वाहन संकुलामध्ये 510 दुचाकी तर 345 चार चाकी वाहनांची पार्किंग सुविधा उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे या ठिकाणी वाहनांच्या चार्जिंगची व्यवस्था सुद्धा करण्यात येईल. शिवाय वाहन धुण्यासाठी वॉशिंग सेंटर ही असणार आहेत. संकुलातील व्यापाऱ्यांसाठी वाहन पार्किंग राखीव असेल. शिवाय आसपासच्या परिसरातील नागरिकांना आपले वाहने या ठिकाणी ठेवायची असल्यास त्यांना देखील मासिक व वार्षिक भाडेतत्त्वावर वाहन पार्किंग साठी  जागा उपलब्ध असेल.नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांसोबतच महानगरपालिकेचे आर्थिक बळकटीकरण देखील यातून होऊ शकते.व्यवसायासाठी 145 दुकाने, 8 ऑफिससाठीच्या जागा,शिवाय बहुउद्देशीय सभागृहातून होणारे उत्पन्न या बाबी आर्थिक उन्नतीसाठी उपयुक्त ठरतील.

अशा प्रकारची ही भव्य दिव्य  संकुले  पनवेल महानगरपालिकेसाठी महत्त्वपूर्ण असणार आहेत निश्चितच यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या मोठ्या प्रमाणात दूर होईल असा विश्वास श्री चितळे यांनी व्यक्त केला.आज दिनांक नऊ जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावांना आर्थिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment