पनवेल तालुका प्रेस क्लबच्यावतीने हुतात्मा हिरवे गुरुजी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप
पनवेल :पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून पनवेल महापालिकेच्या हुतात्मा हिरवे गुरुजी शाळेतील विद्यार्थ्यांना ‘शालेय शैक्षणिक साहित्य’ वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त डॉ.रूपाली माने ह्या प्रमुख पाहुण्या उपस्थित होत्या.
यावेळी पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे उपाध्यक्ष तृप्ती पालकर खजिनदार राकेश पितळे, राजेंद्र पाटील,ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी,संजय कदम,सुमंत नलावडे,अनिल भोळे,वर्षा कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ.रूपाली माने म्हणाल्या,माझेही शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे.त्यामुळे या शाळांशी माझे भावनिक नाते आहे.महापालिकेच्या दगडी शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी खूप कष्ट घेत आहेत.पनवेल तालुका पत्रकार क्लबच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम राबविला आहे.त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.
समारोपप्रसंगी पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे म्हणाले,प्रेस क्लबच्यावतीने आम्ही विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवित असतो. या कामांच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यत पोहचण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो.दगडी शाळेचा मोठा इतिहास आहे. या शाळेमधून अनेक मोठी माणसे घडली आहेत.हीच परंपरा अजूनही या शाळेने पुढे सुरू ठेवली आहे.या शाळेसाठी कोणतीही मदत आवश्यक असल्यास आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी राहू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
या कार्यक्रमाची सुरूवात विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुजीत म्हात्रे यांनी सर्वांचे स्वागत करून,शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेली प्रगती विषयक माहिती दिली.पनवेल तालुका पत्रकार क्लबच्या माध्यमातून देण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्यचा शाळेतील विद्यार्थ्यांना उपयोगी पडणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक वैभव पाटील यांनी केले.यावेळी शाळेतील शिक्षकवर्ग कमल तायडे,वैशाली सावळे,अर्चना माने,स्वाती पाटील उपस्थित होते.
Post a Comment