खारघरमध्ये 'कोयता गॅंग' सक्रिय
पनवेल ( वार्ताहर ) : खारघरमध्ये पुन्हा एकदा चोरट्यांची कोयता टोळी सक्रिय झाली आहे. तीन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास एकाच रात्री खारघर उपनगरामधील सेक्टर १६ येथील वास्तुविहार सोसायटीमधील ज्या घरांना कुलूप होते अशा घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. तब्बल १८ लाख रुपयांची घरफोडी करून चोरटे फरार झाले.हातामध्ये कोयता घेतलेली ही चोरट्यांची टोळी घरात लूटमार करत असल्याने भीतीचे वातावरण आहे.
काही चोरटे वास्तुविहार गृहसंकुलातील संस्कृती सोसायटी मधील घरामधील लाकडी कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी १७ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरला. त्यानंतर चोरट्यांनी पहिल्या मजल्यावरील बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला.त्यानंतर याच इमारती मधील इमारतीमधील बंद घरांचे कुलूप तोडून घराची झडती घेतली. या प्रकरणी खारघर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Post a Comment