News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

शेतकऱ्यांच्या बांधावर ....पनवेल तालुका प्रेस क्लबच्यावतीने प्रगतशील शेतकरी आत्मारामशेठ हातमोडे यांचा तहसीलदार विजय पाटील यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मान

शेतकऱ्यांच्या बांधावर ....पनवेल तालुका प्रेस क्लबच्यावतीने प्रगतशील शेतकरी आत्मारामशेठ हातमोडे यांचा तहसीलदार विजय पाटील यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मान

पनवेल (प्रतिनिधी): परंपरागत पद्धतीला नाविन्यपूर्ण प्रयोग आणि संशोधनाची जोड दिली तर शेती ही अजूनही उत्तम उत्पन्न देत असल्याचे दाखवून देणाऱ्या गिरवले येथील शेतकरी आत्मारामशेठ हातमोडे हे मूर्तिमंत उदहारण आहे असून या प्रगतशील शेतकऱ्याच्या कर्तृत्वाची दखल घेत पनवेल तालुका प्रेस क्लबच्यावतीने नुकतंच शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन तहसीलदार विजय पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आलं.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून आपण पत्रकार आहोत परंतु आपला अन्नदाता हा शेतकरी आहे ही जाण ठेवून पनवेल तालुका प्रेस क्लब आणि रायगड प्रेस क्लब हे दरवर्षी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचं आपण काही देणं लागतो या उद्देशाने त्यांचा गौरव करत असतात. यावेळी तहसीलदार विजय पाटील यांनी प्रगतशील शेतकरी आत्मारामशेठ हातमोडे यांचे तोंड भरून कौतुक केलं.या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार विजय पाटील, गिरवले गावचे सरपंच प्रताप हातमोडे,शैलेश म्हात्रे,भूषण हातमोडे,प्रदीप बाळाराम हातमोडे,विजय गायकर,चेतन हातमोडे,प्रथमेश हातमोडे, केशव हातमोडे  तर या कार्यक्रमासाठी पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे, सचिव दत्तात्रेय कुलकर्णी,सह सचिव स्वप्नील दुधारे, खजिनदार राकेश पितळे,सल्लागार गणेश कोळी,संजय कदम, सुमंत नलावडे, अनिल भोळे,सदस्य राजेंद्र पाटील व प्रतिक वेदपाठक यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. 
पनवेल शहर हे नव्याने विस्तारत आहे शेजारीच विमानतळ लवकरच सुरू होणार असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होणार असंही त्यांनी यावेळी सांगितलं.आज पनवेलच्या आजूबाजूचा शेतकरी हा आपल्या शेतजमिनी विकून प्रचंड पैसा कमावत असला तरीही हातमोडे यांनी मात्र या सगळ्या लोभात न पडता आपली शेती हीच उत्कृष्ट आहे आणि शेती म्हणजे माझा आत्मा आहे असं त्यांनी सांगितलं. वयाच्या पंधराव्या वर्षापासून हातमोडे हे शेती करत असतात आता त्यांची दोन्ही मुलं देखील त्यांना या शेतीकामात हातभार लावत आहेत त्यामुळे त्यांचं उत्पन्न हे प्रचंड निघते त्याचबरोबर त्यांच्या शेतातील शेतमाल हा बाहेर देशात देखील निर्यात होतो असं त्यांनी यावेळी अभिमानाने सांगितलं. शेतकरीच आमचा मायबाप असून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि अशा शेतकऱ्यांचा गुणगौरव आम्ही नेहमीच करू असं पनवेल तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी यावेळी सांगितलं.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी केलं तर संजय कदम यांनी आभार मानले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment