पनवेल महानगरपालिकेची तात्काळ कारवाई ... शालेय विद्यार्थ्यांना जेवणाचा डब्बा,ताट धुण्यास लावणे प्रकरणी मुख्याध्यापिका निलंबित .... शिक्षणाधिकाऱ्यास कारणे दाखवा…
पनवेल...पनवेल महानगरपालिका अंतर्गत असलेल्या श्री गणेश विद्या मंदिर शाळा क्र.6मध्ये विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट धुवावयास लागत असलेली बातमी एका टि.व्ही चॅनल मार्फत प्रसारीत करण्यात आली.विद्यार्थ्यांना ताट धुवावयास लावणे ही बाब अत्यंत गंभीर व चुकीची असल्याने याची तातडीने दखल घेवून पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी शाळेच्या मुख्याध्यापिका यांना तात्काळ निलंबित केले असून शिक्षण अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
पनवेल महानगरपालिका अंतर्गत असलेल्या या शाळेमध्ये सदरील कामे करण्यासाठी अक्षयपात्र या संस्थेची निवड शाळा व्यवस्थापन समिती मार्फत करण्यात आलेली आहे. सदरील कामे करणाऱ्या आया यांना ही बदलावे असे स्पष्ट आदेश सबंधित संस्थेला या प्रकरणी देण्यात आलेले आहेत. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.सुमन सुदाम हिलम यांना या प्रकरणी निष्काळजीपणा केल्यामुळे तात्काळ निलंबित करण्यात आले तर पनवेल महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.
पनवेल महानगरपालिका अंतर्गत असलेल्या सर्व शाळांमध्ये अशा प्रकारच्या बाबींसंदर्भात कसल्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा निष्काळजीपणा चालणार नाही. सर्व संबंधितांनी अत्यंत जागरूकतेने लहान मुलांच्या बाबतीत सतर्क असावे अशा ही सुचना सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत.
Post a Comment