पनवेल महानगरपालिका खारघरमध्ये 'अंतराळ संग्रहालय' उभारणार ....४१.३४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री.मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेच्यावतीने शहरात लवकरच विज्ञान आणि अंतराळ अभ्यासावर आधारित एक भव्य ‘अंतराळ संग्रहालय (Space Museum)’ उभारण्यात येणार आहे.खारघर येथील सेक्टर ३४ मधील प्लॉट क्रमांक ०८ या जागेवर हे अत्याधुनिक संग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव असून,यासाठी ४१.३४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.भविष्यातील वैज्ञानिक पिढी घडवण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व अंतराळ संशोधनाची रुची निर्माण होण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम असणार आहे तसेच सामान्य नागरिकांनाही अंतराळाची माहिती होण्यासाठी हे अंतराळ संग्रहालय उपयुक्त ठरणार आहे.आज झालेल्या सर्वसाधारण प्रशासकिय सभेने या प्रकल्पास मान्यता दिली आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे यांनी दिली आहे.
संग्रहालयातील प्रमुख घटक:
1.विज्ञान व अंतराळ विषयक Exhibition Spaces
2. १२० आसन क्षमतेचा विद्यार्थी बहुउद्देशीय हॉल
3.२२० आसन क्षमतेचा मुख्य बहुउद्देशीय हॉल
4.२ लिफ्ट आणि २ जिन्यांची सुविधा
Post a Comment