मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडून नवी मुंबई विमानतळाची पाहणी ... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ घेऊन सप्टेंबरच्या अखेरीस उद्घाटन होण्याची शक्यता
पनवेल : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पनवेलमधील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट देत विमानतळाची पाहणी केली.यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन कामाच्या प्रगतीचा तपशीलवार आढावा घेतला.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मंत्री गणेश नाईक,आ.महेश बालदी,आ.मंदा म्हात्रे,आ.प्रशांत ठाकूर,लोकनेते रामशेठ ठाकूर,उत्तर रायगड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष अविनाश कोळी व अन्य मान्यवर उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ घेऊन सप्टेंबरच्या अखेरीस उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
Post a Comment