स्थलांतर होण्यासाठी नुकसानापोटी भरपाई ... पनवेल तालुक्यातील पारगाव डुंगी येथील ११३ कुटुंबियांना सिडकोतर्फे धनादेशाचे वाटप
पनवेल दि.२१(वार्ताहर): पनवेल तालुक्यातील पारगाव डुंगी ग्रामस्थांच्या नुकसानीपोटी ११३ कुटुंबियांना करण्यात आले सिडकोतर्फे धनादेशाचे वाटप खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या सुचनेनुसार व पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांच्या प्रयत्नाने करण्यात आले.
मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या सुचनेनुसार सिडको नवी मुंबई यांना सुचित करण्यात आले होते. त्यानुसार मौजे पारगाव डुंगी या गावाला तहसीलदार विजय पाटील यांच्या प्रयत्नानुसार तसेच सदस्य जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती दिशा तथा पारगावच्या माजी सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्या पाठपुराव्याला यश येऊन मौजे डुंगी येथे धनादेशाचे वाटप करण्यात आले. दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात बांधकामाचे तसेच सामानाचे नुकसान होत आहे. चार महिन्याचे स्थलांतरा होण्यासाठी सदर नुकसानापोटी सिडको महामंडळातर्फे ग्रामस्थांना चार महिन्याच्या स्थलांतरिता होण्यासाठी घर बऱ्यापोटी 50 हजार रुपये दिले जातात.सदर धनादेश तहसीलदार पनवेल यांच्या कार्यालयामार्फत आज ग्रामपंचायत पारगाव येथे ११३ कुटुंबाना वाटप करण्यात आले.यावेळी प्रशासकीय अधिकारी संतोष ठोंबरे,ग्रामसेविका सौ.वानखेडे,माजी उपसरपंच निशा पाटील,मनोज दळवी,तलाठी क्षमा पवार,बाळासाहेब नाईक, प्रमोद नाईक,पोलीस पाटील श्रीधर पाटील व ग्रामपंचायत कार्यालयातील क्लार्क प्रमोद म्हात्रे उपस्थित होते.
Post a Comment